बरेचदा स्त्री ला गर्भधारणा होते व गर्भपात होतो, अंस बरेचदा होत अन हा अनुभव जोडप्यासाठी अत्यंत तणावपुर्वक असतो. अशा पेशंटसाठी आम्ही विशेष चाचण्या करतो.
काहीवेळा, दाम्पत्याचा आधिच्या बालकामध्ये मतिमंदता किंवा अनुवंशिक दोष आढळतात तेव्हा अशा दाम्पत्याना आमच्याकडे अनुवंशिक समुपदेशन केले जाते व त्यानुसार उपचार पदधती केली जाते.
जर दांपत्य हे अनुवंशिक रोगाचे वाहक असेल किंवा पूर्वीचे बालकामध्ये काही अनुवंशिक विकार आढळलयास P G D / P G S तंत्रज्ञानाच्या अवलंब करण्याचा सल्ला पेशंटला दिला जातो.
इथे I V F केले जाते आणि भ्रूणाची (BIOPSY) बायोप्सी करून तो अनुवंशिक विकार आहे का पाहिले जाते आणि फक्त निरोगी भ्रूण पेशंटच्या गर्भाशयात प्रस्थापित केला जातो जेणेकरून विकारयुक्त बालक जन्माला येण्याची शक्यता राहत नाही
