एका वर्षापर्यंत कोणत्याही प्रकारच्या गर्भनिरोधक चा वापर न करता शारीरिक संबंध ठेवूनही गर्भधारणा न होणे ही वंध्यत्वाची पुस्तकी परीभाषा आहे, तथा बरीच दाम्पत्य एक वर्षाच्या आतच वैद्यकीय सल्ल्यास येतात.
बाळ जन्माला घालण्याचा निर्णय हा आयुष्य बदलून टाकणारा असतो. ते गोबरे गोबरे गाल, छोटी छोटी पावलं या विचारानेच आनंद आणि उत्साह हृदयात ओसंडून वाहू लागतो. जवळ जवळ ३०% दाम्प्त्याला गर्भधारणेमध्ये अडचणी निर्माण होतात मदतीची गरज भासते अन वंध्यत्वामुळे स्त्रियांवर येणारा ताणतणाव व चिंता हे दोन्ही आम्ही जाणतो.
आमचे बोधवाक्य च आहे “ कमीत कमी खर्च जास्तीत जास्त यश ” पूर्ण पॅकेजची कल्पना उपचारापूर्वी दिली जाते नंतर कोणत्याही प्रकारचे अधिकतम खर्च किंवा फी घेतली जात नाही








